Archaeologist KK Mohammad Appeal To Muslims : मुसलमानांनी काशी आणि मथुरा हिंदूंच्या नियंत्रणात द्यावे ! – पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मुसलमानांनी मोठे मन दाखवून काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या भूमीवर बांधलेली मशिदीची जागा हिंदूंकडे सोपवली पाहिजे; कारण या स्थानांवर हिंदूंची गाढ श्रद्धा आहे, असे आवाहन प्रसिद्ध प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी केले. ते एका कार्यक्रमात बोलत होते. ‘मुसलमानांना या ठिकाणांशी संलग्न असलेल्या मशिदींशी कोणतीही भावनिक ओढ नाही आणि ऐतिहासिक चुका सुधारण्यासाठी मुसलमानांनी स्वतः पुढे यावे’, असेही ते म्हणाले. के.के. महंमद यांनी बाबरी ढाच्याच्या ठिकाणी उत्खनन करून श्रीरामजन्मभूमी मंदिराविषयी महत्त्वाचे निष्कर्ष काढले होते आणि त्या ठिकाणी एक प्राचीन मंदिर असल्याचे सांगितले होते.
मुसलमान बहुसंख्य असते, तर भारताची धर्मनिरपेक्षता टिकवणे कठीण झाले असते !
के.के. महंमद पुढे म्हटले आहे की, भारत आज धर्मनिरपेक्ष आहे, तो हिंदूंमुळेच आहे. येथे हिंदु बहुसंख्य आहेत, त्यामुळे देश धर्मनिरपेक्ष आहे. यासाठी मुसलमानांनी आभार मानले पाहिजेत. मुसलमान बहुसंख्य असते, तर भारताची धर्मनिरपेक्षता टिकवणे कठीण झाले असते. (भविष्यात भारतात हीच स्थिती येणार आहे. भारतात आताच मुसलमान १४ टक्के आहेत, तर अनेक ठिकाणी हिंदूंना मार खावा लागत आहेत. उद्या ते ३० टक्के झाले, तर भारत इस्लामी देश झाल्याखेरीज रहाणार नाही, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक) स्वातंत्र्यानंतर मुसलमानांंसाठी पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली, तर हिंदूंना भारत देण्यात आला, तरीही हिंदूंनी तो हिंदू देश बनवला नाही, तो धर्मनिरपेक्ष ठेवला आणि त्यासाठी मुसलमानांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
संपादकीय भूमिकाजो इतिहास आहे, तोच के.के. महंमद सांगत आहेत; मात्र धर्मांध मुसलमान जाणीवपूर्वक तो नाकारत आहेत. असे लोक हिंदूशी कधीतरी बंधूभावाने वागू शकतील का ? भारतात अशी एकतर्फी धर्मनिरपेक्षता कधीतरी राहू शकते का ? |