Turkey on Kashmir issue : काश्मीरच्या सूत्रावर नेहमी पाकला पाठिंबा देणार्या तुर्कीयेचे प्रथमच संयुक्त राष्ट्रांत मौन
तुर्कीयेची ब्रिक्स संघटनेत सहभागी होण्याची शक्यता
(ब्रिक्स म्हणजे ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांची संघटना)
न्यूयॉर्क (अमेरिका) – काश्मीरच्या सूत्रावर नेहमी पाकिस्तानची बाजू घेणार्या तुर्कीयेने यावर संयुक्त राष्ट्र महासभेत आता मौन बाळल्याचे दिसून आले. काश्मीरसाठीचे कलम ३७० हटवल्यापासून म्हणजे वर्ष २०१९ पासून तुर्कीये पाकिस्तानच्या बाजूने मत मांडत होता. आता तुर्कीयेचे प्रमुख एर्दोगान यांनी या वेळी मात्र संपूर्ण मौन बाळगले.
तुर्कीयेला ‘ब्रिक्स’मध्ये सहभागी व्हायचे आहे. भारत ब्रिक्सचा संस्थापक सदस्य आहे. पुढच्या महिन्यात रशियाच्या कजानमध्ये या संघटनेचे शिखर संमेलन होणार आहे. त्यात एर्दोगन सहभागी होऊ शकतात.
संपादकीय भूमिकाब्रिक्स संघटनेत सहभागी होण्यासाठी तुर्कीयेने काश्मीरप्रश्नी मौन न बाळगता भारताच्या बाजूने बोलायला हवे, अशी अट भारताने घातली पाहिजे ! |