Bihar : क्षुल्लक कारणावरून लोकांकडून पोलिसांना मारहाण
बिहारमध्ये जंगलराज !
नवादा (बिहार) – येथील कहुआरा गावाजवळ पोलिसांना क्षुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
पोलिसांचे वाहन जात असतांना काही लोकांनी पोलिसांना शिवीगाळ केली. यानंतर पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केल्यावर येथे वाद झाला. या वेळी एका तरुणाने पोलिसांवर हात उचलल्यावर दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली. लोकांनी काठ्यांद्वारे पोलिसांना मारहाण केली. या प्रकरणी नरदीगंज पोलीस ठाण्याचे प्रमुख गिरीश प्रसाद म्हणाले की, पोलिसांच्या पथकावर काही जणांनी आक्रमण केले. त्यांची ओळख पटली आहे. त्यांचा शोध घेत आहोत.
संपादकीय भूमिकास्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? |