५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बेंगळुरू येथील कु. अभिनव गुरुराज शर्मा (वय १२ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. अभिनव शर्मा हा या पिढीतील आहे !
‘वर्ष २०२० मध्ये ‘कु. अभिनव गुरुराज शर्मा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१९.९.२०२४) |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
बेंगळुरू (कर्नाटक) येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. अभिनव गुरुराज शर्मा (वय १२ वर्षे) उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला आहे. त्याच्या वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. ऐकण्याची आणि विचारण्याची वृती वाढणे
‘अभिनवचा हट्टीपणा न्यून झालेला आहे. तो परिस्थिती लगेच स्वीकारतो. तो आई आणि वडील यांनी सांगितलेले ऐकतो. तो प्रत्येक गोष्ट विचारून करतो, उदा. कुठे जायचे असेल, तर आई-वडिलांना सांगून जातो.
२. व्यष्टी साधना
तो श्रद्धेने आणि एकाग्रतेने नामजप करतो. तो भावपूर्ण पूजा करतो, तसेच शाळेत जातांना प्रार्थना करून जातो.
३. चुकांविषयी संवेदनशीलता
आम्ही त्याच्या चुका सांगितल्यावर तो ऐकतो. तो आम्हाला त्याच्या चुका सांगतो, तसेच तो इतरांकडून झालेल्या चुकाही सांगतो, उदा. ठरलेल्या वेळेत वडील घरी आले नाहीत, तर तो त्यांची चूक सांगतो.
४. साहाय्य करणे
तो घरी कुटुंबातील सदस्यांना साहाय्य करतो, तसेच सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन असेल, तर त्यासाठी साहाय्य करतो.
५. गुरूंप्रती श्रद्धा
तो रात्री झोपतांना गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) स्मरण करतो. तो त्यांच्या अवतार कार्याविषयी श्रद्धेने ऐकतो. त्याला गुरूंविषयी बोलणे आणि ऐकणे आवडते.
६. धर्माभिमान
तो त्याच्या मित्रांना ‘हलाल जिहाद’विषयी माहिती सांगून ‘हलाल प्रमाणित साहित्य’ वापरण्यापासून रोखतो.
७. अनुभूती
एकदा तो खेळत असतांना एक टोकदार खेळणे त्याच्या डोळ्यावर आपटले. ते खेळणे केवळ त्याच्या डोळ्याच्या बाहेरून लागल्याने किंचित जखम होऊन गुरुदेवांच्या कृपेने डोळा वाचला. तेव्हा तो म्हणाला, ‘‘गुरुदेव आपले क्षणोक्षणी रक्षण करत आहेत.’’
– श्री. गुरुराज शर्मा (वडील) बेंगळूर, कर्नाटक, (१८.५.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |