महिष दसरा समितीने मैसुरूचे नाव ‘महिषुरू’ ठेवले !
येथील चामुंडा टेकडीला दिले महिषा टेकडी नाव !
(महिष दसरा म्हणजे महिषासुराचा उत्सव)
मैसुरू (कर्नाटक) – महिष दसरा साजरा करणार्या समितीने प्रसिद्ध केलेल्या निमंत्रण पत्रिकेत मैसुरूचे नाव ‘महिषुरू’ आणि येथील चामुंडी टेकडीचे ‘महिषा टेकडी’ असे नाव छापले आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
२९ सप्टेंबर या दिवशी महिषा दसरा साजरा करण्याचा समितीचा उद्देश आहे. त्या दिवशी चामुंडी टेकडीवर महिषासुराला पुष्पांजली अर्पण केली जाईल आणि त्यानंतर नगर भवनात कार्यक्रम होईल. या दसर्याला विरोध केला जात आहे.
चामुंडी टेकडीवर महिष दसरा साजरा करण्याला विरोध करणार ! – माजी खासदार प्रताप सिंह यांचे विधान
माजी खासदार प्रताप सिंह यांनी महिष दसरा साजरा करणार्या समितीला आव्हान दिले आहे. जर चामुंडी टेकडीवर महिष दसरा साजरा करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही ‘चामुंडी चलो’ मोहीम चालू करू. महिषाच्या भक्तांचा विजय येतो कि चामुंडीच्या भक्तांचा ?, हे बघूच, असे त्यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाअसुराचे उदात्तीकरण करणारे धर्मद्रोही असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहातच टाकायला हवे ! |