मुंबई सशस्त्र पोलीस दलातील १२ पोलीस शिपाई निलंबित !

अचानक अनुपस्थित राहून रिझर्व्ह बँकेची सुरक्षा धोक्यात टाकल्याचा आरोप

मुंबई – मुंबई पोलिसांच्या ‘लोकल आर्म्स’ (सशस्त्र पोलीस) दलातील १२ पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. फोर्ट येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दोन इमारतींवर (जुनी आणि नवीन इमारत) पहारा देणारे मुंबई पोलिसांचे ११ कर्मचारी आणि त्यांच्या आस्थापनाचे कारकून कुणालाही न कळवता कामाच्या ठिकाणी अनुपस्थित राहिले. या प्रकरणी त्यांच्यावर वरील कारवाई करण्यात आली. बँकेची सुरक्षा धोक्यात टाकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका :

पोलिसांवर अशा प्रकारे त्या त्या वेळी कारवाई झाली, तर सर्वत्रचे पोलीस सतर्क होऊन ते त्यांचे कर्तव्य पार पाडतील !