बांगलादेशात मुसलमान तरुणाकडून हिंदूंच्‍या देवतांच्‍या मूर्तींची तोडफोड

यासीन (मध्यभागी )

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील मैमनसिंग जिल्‍ह्यात २२ वर्षांच्‍या यासीन नावाच्‍या मुसलमान तरुणाने हिंदूंच्‍या देवतांच्‍या मूर्तींची तोडफोड केली. पोलिसांनी यासीन याला अटक केली आहे.

यासिन याने २५ सप्‍टेंबर या दिवशी मैमनसिंग जिल्‍ह्यातील गौरीपूर शहरातील गोविंदज्‍यू मंदिरात प्रवेश केला आणि गेल्‍या २० दिवसांपासून बनवण्‍यात येत असलेल्‍या देवतांच्‍या मूर्तींची तोडफोड करण्‍यास चालू केले. हे पाहून स्‍थानिक हिंदूंनी त्‍याला पकडले आणि नंतर पोलिसांच्‍या कह्यात दिले. यासीन मानसिकदृष्‍ट्या विकलांग असल्‍याचा दावा त्‍याच्‍या आईने केला आहे. (कथित मानसिकदृष्‍ट्या विकलांग असणार्‍या मुसलमानांना हिंदूंच्‍याच देवतांच्‍या मूर्तींना, मंदिरांना लक्ष्य करण्‍याची बुद्धी कशी होते ? तेव्‍हा ते विकलांग नसतात का ? स्‍वतःच्‍या धार्मिक स्‍थळांची ते अशा वेळी तोडफोड का करत नाहीत ? – संपादक) पोलिसांनी त्‍याच्‍यावर हिंदूंच्‍या भावना दुखावल्‍याचा गुन्‍हाही नोंदवला आहे.

या प्रकरणावर बांगलादेश ‘हिंदू बौद्ध ख्रिश्‍चन एैक्‍य परिषदे’चे (गौरीपूर उपजिल्‍हा) अध्‍यक्ष म्‍हणाले की, सर्व मूर्ती जवळपास मोडकळीस आले आहेत. ‘हे का केले गेले ?’, हे मला समजत नाही. मी माझ्‍या आयुष्‍यात अशी घटना यापूर्वी कधीच पाहिली नव्‍हती.

(वरील छायाचित्रे  देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

संपादकीय भूमिका

हे जगभरातील हिंदूंना लज्‍जास्‍पद !