सांगली येथे २९ सप्टेंबरला विनामूल्य आरोग्य पडताळणी आणि रक्तदान शिबीर !
सांगली, २७ सप्टेंबर (वार्ता.) – ‘धर्मवीर संभाजी महाराज गोरक्षक सेना (महाराष्ट्र राज्य)’ आणि ‘उष:काल अभिनव मल्टी सुपर स्पेशालिटी रुग्णालय, सांगली’ यांच्या संयुक्त विद्यमाने २९ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत येथील बापट बाल शिक्षण मंदिर येथे ‘विनामूल्य आरोग्य पडताळणी आणि रक्तदान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये रक्तदाब, रक्तातील साखरेची पडताळणी, ई.सी.जी., आहार तज्ञांचे मार्गदर्शन, तसेच प्रत्येकाची आधुनिक वैद्यांद्वारे (डॉक्टरांद्वारे) पडताळणी करण्यात येणार आहे. या शिबिरात ४० वर्षांवरील केवळ नोंदणीकृत महिलांसाठी ‘विनामूल्य मॅमोग्राफी पडताळणी’ करण्यात येणार असून त्यावर डॉ. विकास गोसावी यांचे मॅमोग्राफीवर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. तरी या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘धर्मवीर संभाजी महाराज गोरक्षक सेने’चे संस्थापक अध्यक्ष श्री. विनायक येडके यांनी केले आहे.