महायुतीत माझ्यासाठी जागा नसल्यामुळे मी विधान परिषदेवर ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, आमदार
छत्रपती संभाजीनगर – महायुतीमध्ये मला लढण्यासाठी कुठली जागा नाही. त्यामुळे मी विधान परिषदेची आमदार आहे. बीड लोकसभेची जागा माझ्यासाठी माजी खासदार सौ. प्रीतम मुंडेंना सोडावी लागली नाही, तर पक्षाने मला उमेदवारी घोषित केल्याने मला ती लढावी लागली, असे भाजपच्या नेत्या सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी म्हटले आहे.
सौ. पंकजा मुंडे-पालवे पुढे म्हणाल्या की, निवडणूक लढवण्याची वेळ येईल, तेव्हा निवडणूक लढवू आणि जेव्हा संघटनेचे काम करण्याची वेळ येईल, तेव्हा संघटनेचे काम करू. गेली ५ वर्षे मीही संघटनेचे काम केलेले आहे. आमच्या कुटुंबियांवर भाजपचे संस्कार आहेत. योग्य वेळी जो निर्णय घ्यावा लागेल, तो आम्ही घेत राहू.