सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !
वैखरीतून होणार्या नामजपापेक्षा नाभीतून होणारा नामजप पुढच्या टप्प्याचा असल्याने नाभीतून होणारा नामजप करावा !
सुश्री (कु.) सुगुणा गुज्जेटी : पूर्वी एकदा तुम्ही मला अंतर्मुखता वाढवण्यासाठी अधिकाधिक नामजप करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे मी प्रयत्न केला. त्यामुळे ‘आता माझा नामजप वैखरीतून न होता नाभीतून (पोटातून) होत आहे’, असे मी अनुभवत आहे. मी आता नामजप वैखरीतून करू कि नाभीतून (पोटातून) करू ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : नामजपाचे वेगवेगळे टप्पे असतात. नाभीतून होणारा नामजप हा पुढील टप्प्याचा आहे; म्हणून नाभीतून होणारा नामजपच करावा.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे नाभीतून (पोटातून) होणारा नामजप चालू ठेवल्यावर साधिकेला स्वतःत जाणवलेले पालट !
१. ‘मी नाभीतून (पोटातून) होणारा नामजप चालू ठेवल्यावर ‘माझ्या पोटावर पुष्कळ उपाय होत आहेत’, असे मला जाणवते.
२. मला माझे पोट हलके वाटू लागले. मला ‘थायरॉईड’ ग्रंथीच्या संदर्भातील आजार असल्यामुळे बद्धकोष्ठता होत असे; परंतु प.पू. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर माझ्या पोटाच्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत.
३. पूर्वी नामजप करतांना माझ्या मनात अनेक विचार असत. जेव्हा माझा नामजप नाभीतून (पोटातून) होतो, तेव्हा माझे लक्ष नामजपाकडे जाते आणि माझ्या मनातील अनावश्यक विचार न्यून होतात. आता माझा नामजप एकाग्रतेने होत आहे.
४. मी सतत भावावस्था अनुभवत आहे.
‘मला ही सुंदर अनुभूती प.पू. गुरुदेवांच्या संकल्पामुळे येत आहे’, यासाठी मी त्यांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सुश्री (कु.) सुगुणा गुज्जेटी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |