भगवंताचे नाव त्याच्यापर्यंत पोचतच नाही, हे कसे शक्य आहे ?

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चालत असतांना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले, तर तो लगेच मागे वळून बघतो. ही जर मनुष्याची स्थिती, तर भगवंताचे नाव त्याच्यापर्यंत पोचतच नाही, हे कसे शक्य आहे ? खरे पाहिले, तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते, त्याचे नाव तोच घेत असतो. मग भगवंतापर्यंत पोचते कि नाही ? या शंकेला वावच कुठे राहिला ?

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज