विठ्ठलवाडी (जिल्हा ठाणे) येथे नशेखोराचे महिला पोलीस कर्मचार्यावर ब्लेडने आक्रमण !
ठाणे, २७ सप्टेंबर (वार्ता.) – उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे एका नशेखोराने एका प्रकरणाची तक्रार घेण्याची मागणी करत महिला पोलीस कर्मचारी शीतल कांबळे यांच्यावर ब्लेडने वार केले. पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी नशेखोर बाबासाहेब सोनावणे याला अटक केली आहे. (गुन्हेगारांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच ते असे गुन्हे करण्याचे धाडस करतात ! – संपादक) सरकारी कामात अडथळा करणे, हत्येचा प्रयत्न करणे आदी कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घायाळ झालेल्या महिला पोलीस कर्मचार्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार चालू असून तिची प्रकृती स्थिर आहे.