Orissa High Court Warns Lawyer : न्याय आंधळा असतो; पण न्यायाधीश आंधळे नसतात !
|
कटक (ओडिशा) – एका गुन्ह्यात सहभागी असलेला आरोपी गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन होता, हे सांगण्यासाठी त्याचे बनावट शाळा हस्तांतरण प्रमाणपत्र न्यायालयासमोर ठेवण्यात आले. साक्षींकडून परस्परविरोधी साक्ष्य दिली गेल्याने हे न्यायालयाला लक्षात येताच त्याने याचिकाकर्त्याचे अधिवक्ता नित्यानंद पांडा यांना फटकारत म्हटले की, न्याय आंधळा असू शकतो; पण न्यायाधीश आंधळे नसतात. तथापि न्यायव्यवस्था कायद्याचे समर्थन करण्यासाठी कायदेशीर व्यावसायिकांच्या सचोटीवर अवलंबून असते. असे म्हणत न्यायमूर्ती एस्.के. साहू यांनी अंतरिम अर्ज फेटाळला.
Justice is blind, but judges are not
Orissa High Court rebukes advocate for submitting forged documents
It was revealed that fake documents were presented, claiming the accused was a minor at the time of the crime.
🚩In a Hindu Rashtra, judges would be advanced seekers capable… pic.twitter.com/dIxCbisV5F
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 27, 2024
१. एका प्रकरणात गुन्हा सिद्ध झालेला सनातन हेस्सा नावाचा गुन्हेगार बनावट कागदपत्रे जमा करून हे सांगण्याचा प्रयत्न करत होता की, तो गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन होता.
२. यातून त्याला झालेली शिक्षा अल्प होऊ शकेल, असा त्याचा उद्देश होता. तथापि कागदपत्रांची सत्यता पडताळतांना विसंगती समोर आली.
३. यामुळे ऐतिहासिक निर्णयांचा हवाला देत न्यायालयाने अधिवक्त्यांचे सत्य टिकवून ठेवण्यावर भर दिला. तसेच अनुकूल निकाल मिळवण्यासाठी न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीविषयी निराशा व्यक्त केली.
४. न्यायमूर्ती एस्.के. साहू म्हणाले की, अशा फसव्या प्रतिपादनांमुळे कायदेशीर व्यावसायिकांच्या विश्वासाला हानी पोचते आणि न्यायप्रणालीच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो. अशाने जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अल्प होईल.
संपादकीय भूमिकाहिंदु राष्ट्रातील न्यायाधीश हे सूक्ष्मातील समजणारे उन्नत साधक असतील. अशा सक्षम न्यायवस्थेमुळे न्याय त्वरित मिळेल आणि अधिवक्त्यांकडून न्यायालयाची फसवणूक होण्याचा प्रश्नच उद़्भवणार नाही. यामुळेच ‘सनातन प्रभात’ गेली २५ वर्षे अशा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत आहे ! |