Bangladeshi Extremists Demand No Durga Puja : बांगलादेशात आता हिंदूंना दुर्गापूजा न करण्याची धमकी !

  • दुर्गापूजेसाठी हिंदूंना सुटी देण्यासह सरकारी साहाय्य देण्यासही विरोध

  • पर्यावरणाची हानी होत असल्याने दुर्गापूजेला अनुमती नाकारण्याची मागणी

ढाका (बांगलादेश) : बांगलादेशात हिंदूंनी दुर्गापूजा करू नये, अशी धमकी जिहादी संघटनांकडून दिली जात आहे. यापूर्वी खुलना जिल्ह्यात ‘साडेतीन लाख रुपये दिल्यावरच दुर्गापूजा आयोजित करण्याची अनुमती दिली जाईल’, अशी पत्रे दुर्गापूजा समित्यांना पाठवण्यात आली होती. आता दुर्गापूजेसाठी हिंदूंना सुटी देऊ नये, अशीही मागणी केली जात आहे. जिहादी संघटनांनी ढाकामध्ये मोर्चा काढून दुर्गापूजेला विरोध केला आहे. येथे हिंदू अनेक वर्षांपासून दुर्गा पूजा साजरी करत आहेत.

१. ‘इन्साफ कीमकारी छात्र-जनता’ नावाच्या संघटनेने बंगाली भाषेतील फलक हातात घेऊन निषेध केला. या फलकांवर ‘रस्ते बंद करून पूजा होणार नाही’, ‘मूर्ती विसर्जन केल्याने जलप्रदूषण होईल’, ‘मूर्तींची पूजा केली जाणार नाही’, असे लिहिले होते. या गटाने १६ कलमी मागणीपत्रही दिले आहे.

२. या सणामुळे पर्यावरणाची हानी होते. धार्मिक कार्यक्रमांसाठी रस्ते बंद करण्यावर बंदी घालणे आणि सण-उत्सवांवर सरकारी साहाय्य निधीचा वापर न करणे, यांसह इतर अनेक मागण्या या संघटनेने केल्या आहेत. बांगलादेशात अशा मागण्या मांडण्यात आल्याने हिंदूंमध्ये तणावाचे वातावरण आहे.

मंदिरांवर भारतविरोधी फलक लावण्याची मागणी !

जिहादी संघटना हिंदूंना बांगलादेशप्रती निष्ठा सिद्ध करण्यास सांगत आहेत. यासाठी सर्व मंदिरांवर भारतविरोधी फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. (स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतातील हिंदूंनी कधी मुसलमानांना त्यांच्या मशिदींवर आणि मदरशांवर पाकिस्तानविरोधी फलक लावण्यास भाग पाडले आहे का ? हिंदु सहिष्णु असल्याने त्यांनी असे कधी केले नाही; मात्र इस्लामी देशांमध्ये हिंदूंना निष्ठा व्यक्त करण्यास भाग पाडले जात आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)

हे ही वाचा – Durga Puja Threat Bangladesh : दुर्गापूजा करायची असेल, तर ५ लाख टका (अनुमाने साडेतीन लाख रुपये) द्या !

संपादकीय भूमिका

  • बांगलादेश आता दुसरा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान बनला आहे. तेथील हिंदूंना पलायन करून भारतात येण्याखेरीज दुसरा पर्याय रहाणार नाही. त्यापूर्वीच भारत सरकारने योग्य पावले उचलणे आवश्यक आहे !
  • इस्लामी देशात हिंदू अल्पसंख्यांक असल्यावर काय भोगावे लागते ?, हे पहाता भारतातील धर्मांध अल्पसंख्यांक मुसलमान किती उद्दाम आहेत ?, हे लक्षात येते !