८ दिवसांत गुन्हे मागे न घेतल्यास भारतभरातील साधू-संतांसह लाखो हिंदुत्वनिष्ठ रस्त्यावर उतरण्याची चेतावणी
भिवंडी येथे निष्पाप हिंदूंवर गुन्हे नोंदवल्याच्या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि साधू-संत यांच्याकडून पोलीस आयुक्तांची भेट !
ठाणे – भिवंडीत गणेशमूर्ती विसर्जनाच्या काळात दगडफेक करून गणेशमूर्तीची विटंबना करण्यात आली होती. या प्रकरणी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करणार्यांवर कारवाई न करता पोलिसांनी हिंदु समुदायावरच गुन्हे नोंदवले. याच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि साधू-संत संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर या दिवशी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली साधू-संतांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतली. ‘८ दिवसांत गणेशभक्तांवरील गुन्हे मागे न घेतल्यास भारतभरातील साधू-संतांसह लाखो हिंदुत्वनिष्ठ भिवंडीत रस्त्यावर उतरतील’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.
साधू-संतांकडून पत्रकार परिषदेचे आयोजन !
साधू-संतांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात साधू-संतांनी पोलिसांच्या अन्यायकारक भूमिकेविषयी सांगितले. या वेळी स्वामी भारतानंद महाराज, स्वामी शिवरूपानंद सरस्वती, परागबुवा रामदासी, स्वामी शिवगिरी महाराज, महंत चिदानंद महाराज यांच्यासह अनेक साधूसंतासह ‘विश्व हिंदु परिषदे’चे राजेश कुंटे, आशुतोष तिवारी, वैभव महाडिक, दादा गोसावी आदी उपस्थित होते.
साधू-संतांकडून पत्रकार परिषदेचे आयोजन !
साधू-संतांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात साधू-संतांनी पोलिसांच्या अन्यायकारक भूमिकेविषयी सांगितले. या वेळी स्वामी भारतानंद महाराज, स्वामी शिवरूपानंद सरस्वती, परागबुवा रामदासी, स्वामी शिवगिरी महाराज, महंत चिदानंद महाराज यांच्यासह अनेक साधूसंतासह ‘विश्व हिंदु परिषदे’चे राजेश कुंटे, आशुतोष तिवारी, वैभव महाडिक, दादा गोसावी आदी उपस्थित होते. बांगलादेशात सध्या चालू असलेल्या राजकीय रणकंदनात तेथील हिंदूंवर अत्याचार होत आहेत. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहेत. नवरात्रीच्या पूजेच्या आयोजनासाठी तेथे पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे बांगलादेशचे विभाजन करून वेगळा हिंदु देश निर्माण करा.
हिंदु महिला, मुली यांना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढून पळवून नेण्याचे, त्यांचे बळजोरीने धर्मांतर करण्याचे प्रकार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी पीडितेला वाचवण्यासाठी गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर जिहादी मानसिकतेतून जीवघेणे आक्रमण करण्यात आले. आम्ही केंद्र सरकारला आवाहन करतो की, समान नागरी कायदा लागू करा. धर्मांतरविरोधी कायदा, लव्ह जिहाद कायदा, तसेच लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करा.
शांतताप्रिय हिंदूंना वेठीस धरले जाणे आम्ही सहन करणार नाही ! – स्वामी भारतानंद महाराज, महामंत्री, अखिल भारतीय संत संप्रदाय समिती१. दादा गोसावी यांसारख्या गोरक्षक मानवतावादी कार्यकर्त्याला आतंकवादी संबोधता ? जे साधू-संत मानवतावादी काम करत आहेत, त्यांनाच कोठडीत डांबण्याचे काम केले जात आहे. केवळ हिंदु समुदायालाच लक्ष्य केले जात आहे. २. शांतताप्रिय असतांना हिंदूंना वेठीस धरले जात आहे. आता आम्ही हे सहन करणार नाही. ३. पोलीस प्रशासनाकडून अशाच स्वरूपाची भूमिका कायम राहिल्यास हिंदु समाजाला स्वाभिमान, आत्मसन्मान आणि देशहित यांसाठी वेगळा मार्ग अवलंबवावा लागेल. याची महाराष्ट्र सरकार आणि भिवंडी प्रशासन यांनी नोंद घ्यावी. ४. तिरुपती देवस्थानाच्या प्रसादात भेसळ करून हिंदूंच्या भावनांशी खेळणार्यांना फाशीची शिक्षा द्या. तिरुपतीच्या देवस्थानात काम करणारे सर्व कर्मचारी हिंदू असतांना त्यांच्यावरील मुख्य व्यवस्थापक ख्रिस्ती का नेमला आहे ? हे बंद करून सर्व हिंदु देवस्थाने हिंदूंकडेच सोपवावीत. |
संपादकीय भूमिका :
|