पोलिसांनी स्वतः ही कृती का केली नाही ?
‘खारेबांध, मडगाव (गोवा) येथे एका इमारतीच्या तळमजल्यात चालू असलेले पशूवधगृह बजरंग दलाच्या पदाधिकार्यांनी उघड केले आहे. त्या ठिकाणच्या २ बैलांची सुटका करून त्यांना ‘ध्यान फाऊंडेशन’कडे सोपवण्यात आले आहेत. मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून या प्रकरणी सखोल अन्वेषण करण्याची मागणी करण्यात आली आहे. पशूवधगृहात गुरांच्या मांसातील चरबीचे २० किलो वजनाचे ४१ डबे आढळून आले. एक डबा भरण्यासाठी २ गुरांना मारावे लागते. या ठिकाणी तब्बल ४१ डबे आढळल्याने किमान ८२ गोवंशियांची हत्या करण्यात आली आहे.’ (२४.९.२०२४)