TAMIL DIRECTOR ARRESTED : तमिळनाडूतील प्रसिद्ध पलानी मंदिरातील पंचामृताविषयी गंभीर आरोप करणार्या अभिनेत्याला अटक
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूतील प्रसिद्ध पलानी मंदिराच्या पंचामृतामध्ये नपुंसकत्व निर्माण करणारी औषधे मिसळली जात असल्याचा आरोप तमिळ चित्रपट दिग्दर्शक मोहन जी. यांनी केला आहे. या आरोपानंतर मोहन यांना अटक करण्यात आली.
TAMIL DIRECTOR ARRESTED FOR DEFAMING PALANI TEMPLE
Mohan G claimed impotency drug mixed with temple prasad !
Arrested for spreading misinformation!#BJP calls director’s arrest unconstitutional#TamilNadu #FreeHinduTemples
Sanatan Board for Temples#RespectHinduSentiments… pic.twitter.com/jV8J84AlFe— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 27, 2024
एका यू ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मोहन यांनी म्हटले की, पुरुषांमध्ये नपुंसकतेला कारण असलेले औषध पंचामृतामध्ये मिसळले जाते, असे मी ऐकले होते. ही बातमी सर्वत्र पसरण्यापूर्वीच पंचामृत लपवून नष्ट करण्यात आले. पुराव्याखेरीज बोलू नये; पण मंदिराकडून योग्य स्पष्टीकरण दिले गेले नाही. तिथे काम करणार्या लोकांनी मला गर्भनिरोधक गोळ्या पंचामृतात मिसळल्याविषयी सांगितले. हे सर्व हिंदूंवर चालू असलेले आक्रमण आहे.
या मुलाखतीचा व्हिडिओ प्रसारित होताच मोहन यांना तिरुची पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली. पलानी मंदिराच्या पंचामृताविषयी खोट्या बातम्या पसरवणार्यांवर कठोर कारवाई करण्याची चेतावणी तमिळनाडूचे धर्मादाय खात्याचे मंत्री सेकर बाबू यांनी दिली.