दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मसाल्यात रासायनिक भेसळ; ३ धर्मांध कह्यात; मुरबाड येथे वीज पडून तिघांचा मृत्यू !…
मसाल्यात रासायनिक भेसळ; ३ धर्मांध कह्यात
धुळे – शहरातील औद्योगिक वसाहतीतील ‘टॉवर मसाले’ या आस्थापनावर घातलेल्या धाडीत मसाल्यात हानीकारक रंग आणि भेसळ आढळून आली. यामुळे लक्षावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी इम्रान अहमद अख्तर हुसेन (वय ४३ वर्षेे), मसूद अहमद अब्दुल हलीम (वय ४४ वर्षे) आणि जहीद अहमद जलील अहमद अन्सारी (वय ३४ वर्षे) यांना कह्यात घेण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका: प्रत्येक गुन्ह्यात धर्मांधांचाच भरणा असतो, हे आतापर्यंतच्या अनेक घटनांतून उघड झाले आहे !
मुरबाड येथे वीज पडून तिघांचा मृत्यू !
ठाणे – येथे वीज पडून दगडाच्या खाणीत काम करणारे राजन यादव आणि बंधनाराम मुंधा या मजुरांचा मृत्यू झाला. येथील शिरगाव भागातील परशू पवार या शेतकर्याच्या घरावर वीज पडून त्याचाही जागीच मृत्यू झाला.
कुसुंबा (जळगाव) येथे घरकुलांसाठी भूखंड !
जळगाव – येथील कुसुंबा गावातील २११ घरकुलांसाठी भूखंड देण्याचा निर्णय शक्ती समितीत घेण्यात आला. ‘यामुळे गरिबांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू तरळतील. याचे मला आत्मिक समाधान आहे’, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. पालकमंत्र्यांनी गरजूंना भूखंड देण्यााचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना दिले.
अपहरणकर्त्या १० खंडणीखोरांना अटक
ठाणे – खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या २० वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्या १० आरोपींना पोलिसांनी अटक केली. मुलाच्या वडिलांकडे ४० कोटी रुपये मागितले होते. तडजोडीअंती २ कोटी देण्याचे ठरले. पोलिसांनी भ्रमणभाष क्रमांकाचा शोध घेऊन पडघा तालुक्यातील पिसे धरण परिसरातून मुलाची सुखरूप सुटका केली.
मुसळधार पावसामुळे पंतप्रधानांचा पुणे दौरा तात्पुरता रहित !
पुणे – शहरामध्ये मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २६ सप्टेंबर या दिवशीचा नियोजित पुणे दौरा रहित करण्यात आला आहे. हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त (ऑरेंज अलर्ट) केल्यामुळे हा दौरा रहित झाला. प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन सोहळा यांसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यय करण्यात आला होता.
चाकूने आक्रमण करणारे तिघे अटकेत !
मुंबई – रिक्शाचालक २४ सप्टेंबरला रात्री १ च्या सुमारास वर्सोवा येथील बस थांब्याजवळ थांबले होते. त्या वेळी ३ तरुणांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील १५ सहस्र रुपये आणि भ्रमणभाष हिसकावून घेतला. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर चाकूने आक्रमण केले. यात रिक्शाचालक घायाळ झाले. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सुनीत अनिलकुमार तिवारी, विकास ईश्वर खारवा आणि राहुल अशोक राणा यांना कह्यात घेतले.