सज्जनगडावर स्वच्छतेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना
सातारा, २६ सप्टेंबर (वार्ता.) – श्रीक्षेत्र सज्जनगड येथील वाहनतळ, पायरी मार्ग, तसेच गडाच्या पाठीमागील बाजूस कचर्याचे ढिगारे साठले आहेत. यामध्ये मुख्यतः व्यावसायिकांचा प्लास्टिकचा कचरा असल्यामुळे या कचर्याचे उच्चाटन करून स्वच्छतेच्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिल्या आहेत. सूचनांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असेही बुद्धे म्हणाले.