जळगाव येथे व्यवसायाचे आमीष दाखवून १८ लाख रुपयांची फसवणूक !
जळगाव – एका आस्थापनाची एजन्सी देऊन त्यातून लाभ मिळवून देण्याचे आमीष दाखवत येथील एका दीपक नाथाणी यांच्याकडून वेळोवेळी १८ लाख ९१ सहस्र ५२ रुपये घेण्यात आले. ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी नोएडा (उत्तरप्रदेश) येथील चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्रिदेव वढेरा उपाख्य आकाश अरोरा, निशु गुप्ता, कुणाल शर्मा आणि मनीष कुमार अशी त्यांची नावे आहेत. नाथाणी यांनी चौघांविरोधात तक्रार प्रविष्ट केली होती.
संपादकीय भूमिकालाखो रुपयांची फसवणूक करणार्यांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत, हे सायबर विभाग लक्षात घेईल का ? |