पुणे रेल्वेस्थानकात दुचाकी पार्सलसाठी होणारी प्रवाशांची लूट थांबली !
हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल मराठे यांच्या तक्रारीचा परिणाम !
जळगाव – पुणे रेल्वेस्थानकात ‘सचिन पॅकिंग’ या करार पद्धतीने काम करणार्या आस्थापनकडून पार्सल सेवा पुरवली जाते. वाहनानुसार पार्सलचे जी.एस्.टी.सह किती रुपये भाडे आकारण्यात येईल, याचे दरपत्रक लावलेले आहे. त्यात दुचाकीसाठी ३४३ रुपये दर दिलेला आहे; मात्र आस्थापनाकडून ५५० रुपये आकारले जात होते. नोंदणी करणार्यांकडून २०७ रुपये अतिरिक्त घेण्यात येत होते. ‘पार्सलविषयी काही तक्रार असल्यास ९७६६३५३७७२ या क्रमांकावर संपर्क साधावा’, असा फलक लावलेला असूनही हा भ्रष्टाचार चालू होता. या क्रमांकावर संपर्क करण्यात अडचण येत होती. याविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल मराठे यांनी पुणे रेल्वे मंडळ व्यवस्थापकांकडे ‘एक्स’द्वारे तक्रार केली. त्याची नोंद घेण्यात आली. त्यानंतर वरील संपर्क क्रमांकावर संपर्क करून चौकशी केली असता, तेथे वस्तू आणि सेवा करासह केवळ ३४३ रुपये भाडे आकारले जात असून त्या रकमेची पावतीही दिली जात असल्याचे समजले. (प्रवाशांची होणारी आर्थिक लूट पाहून तत्परतेने रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करणार्या श्री. राहुल मराठे यांचे अभिनंदन ! अन्य प्रवाशांनाही गैरकारभाराच्या विरोधात कृतीशील व्हावे ! – संपादक)
संपादकीय भूमिकापुणे रेल्वे मंडळ व्यवस्थापकांनी प्रवाशांची लूट करणार्यांवर कठोर कारवाई करायला हवी ! |