भारतात हिंदू अल्पसंख्य झाले तर ?
‘आजच्या घडीला भारतात हिंदु समाज मोठ्या प्रमाणात शिक्षित झालेला आहे आणि २१ व्या शतकात तर ते प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अगदी आदिवासी, दलित इत्यादी मागास गणल्या गेलेल्या लोकांनाही शिक्षणाचे महत्त्व समजल्यामुळे त्या समाजातील लोक चिकाटीने शिक्षण प्राप्त करून प्रगती साधत आहेत. शिक्षणामुळे आर्थिक प्रगतीची दारे खुली होतात आणि सामाजिक दर्जाही उंचावतो. मिळवलेला दर्जा सांभाळायचा, तर प्रत्येक व्यक्तीला आर्थिक आणि कौटुंबिक नियोजन करावे लागते. कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी त्याला धडपड करावी लागते. कुटुंबातील सदस्यांची संख्या मर्यादित राखण्याकरता कुटुंब नियोजनाचा मार्गही पत्करावा लागतो.
कुटुंबाच्या प्रगतीसाठी तरुणांनी वरील दोन्ही मार्गांचा अवलंब करणे योग्य आहे, यात शंका नाही; परंतु त्या गोष्टींचा अतिरेक होणार नाही आणि त्यातून कुटुंबाच्या प्रगतीऐवजी कुटुंबव्यवस्था उद़्ध्वस्त होणार नाही ना ?, याचीही तरुणांनी दक्षता बाळगली पाहिजे. आजचा तरुण अर्थप्राप्ती आणि सुखसाधने मिळवण्यासाठी एवढा धडपडत रहातो की, त्याला आपल्या वयाची तिशी उलटून गेल्याचेही भान रहात नाही. तोपर्यंत त्याच्या मनात लग्नाचा विचारही आलेला नसतो. हीच स्थिती तरुणींचीही सर्वसाधारणपणे दिसून येते. लग्न होऊनही लगेच मूल-बाळ नको; म्हणून अपत्यप्राप्ती काही वर्षे पुढे ढकलली जाते. वय जसे पुढे जाते, तशी अपत्यप्राप्ती अवघड होऊन बसते. मग ‘एकच मूल पुरे’ अथवा ‘मूलच नको’, अशा विचारापर्यंत पती-पत्नी येतात. याही पुढे जाऊन प्रपंचाचे दायित्व नको; म्हणून ‘लग्नच नको’, अशी प्रवृत्तीही तरुण-तरुणींमध्ये आढळत आहे. अशा विचारांचा गंभीर परिणाम हिंदु कुटुंबव्यवस्थेवर होऊ लागलेला आहे.
भाग १.
१. घटती लोकसंख्या ही हिंदूंसमोरील मोठी समस्या
‘वन चाईल्ड ऑर नो चाईल्ड’ (‘एकच मूल पुरे’ अथवा ‘मूलच नको’), अशा मानसिकतेमुळे समाजामध्ये हिंदूंचे प्रमाण झपाट्याने घटत आहे. ‘हिंदूंची लोकसंख्या अशीच न्यून होत गेली आणि हिंदू अल्पसंख्य झाला, तर काय होईल ?’, याचा विचारही कुणी करत असल्याचे दिसून येत नाही. एका बाजूने प्रजोत्पत्तीचे प्रमाण घटत आहे, तर दुसर्या बाजूने धर्मांतर करून हिंदूंना अन्य धर्मात ओढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. हिंदूंची संख्या न्यून होत आहे. आदिवासी, मागास जातीच्या लोकांना आमीष दाखवून, तर हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवून त्यांनाही धर्मांतरित केले जात असल्यामुळे हिंदूंसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
२. धर्माच्या नावाखाली वाढत असलेली इस्लामी लोकसंख्या
एका बाजूने हिंदूंची संख्या घटत असतांना मुसलमान समाजाची संख्या मात्र जोमाने वाढत आहे. एका व्यक्तीने किती विवाह करावेत ? आणि किती मुले जन्माला घालावीत ?, यांवर मुसलमान समाजात काहीच बंधने नाहीत. जन्माला आलेली मुले कशाही अवस्थेत राहू शकतात, त्यामुळे कुटुंब मर्यादित राखण्याची आवश्यकता त्यांना भासत नाही. मुसलमान समाजातील बहुतांश मुलांचे शिक्षण मदरशांमध्ये होत असल्यामुळे आणि शिक्षणाच्या सार्वजनिक प्रवाहापासून दूर राहिल्यामुळे ती सामाजिक अन् वैचारिक दृष्ट्या मागास राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे कुटुंब नियोजन हा विषयच त्यांना मान्य नाही. मागे एक आधुनिक वैद्य मला सांगत होते की, ५ मुले पदरात असलेली एक मुसलमान स्त्री त्यांच्या प्रसुतीगृहात६ व्या प्रसुतीसाठी आली होती. तेव्हा डॉक्टरांनी तिला विचारले, ‘कुटुंब नियोजन का केले नाही ?’ यावर ती म्हणाली, ‘नवरा ऐकत नाही.’ डॉक्टरांनी नवर्याला खडसावले, तर तो म्हणाला, ‘ये तो अल्लाकी देन है, हम अस्वीकार नही कर सकते ।’ (ही अल्लाची देणगी आहे, आम्ही ती नाकारू शकत नाही.)
३. वर्ष २०४७ पर्यंत मुसलमान बहुसंख्य होणार ?
तात्पर्य काय, तर हिंदूंची संख्या अतिशय वेगाने न्यून होत चालली असून त्याउलट मुसलमानांची संख्या दुप्पट, चौपट वेगाने वाढत आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५१ या वर्षी झालेल्या जनगणनेनुसार देशाच्या लोकसंख्येत मुसलमानांचे प्रमाण केवळ ९.८ टक्के होते. वर्ष २०११ च्या जनगणनेत ते १४.२३ टक्के झाल्याचे दिसून येते. वर्ष २०२१ ची आकडेवारी उपलब्ध नाही; परंतु वर्ष २०२४ मध्ये ती २५ टक्क्यांच्या जवळपास असल्याचे अनुमान व्यक्त केले गेले आहेत. हिंदूंची घटणारी संख्या आणि लोकसंख्या वाढवण्याचे मुसलमानांचे चाललेले आटोकाट प्रयत्न पहाता ते अनुमान बरोबरच असू शकते.
मुसलमान नेते ‘वर्ष २०४७ पर्यंत भारतात मुसलमान बहुसंख्य होणार आणि भारत इस्लामी राष्ट्र होणार’, अशी भाषा करत आहेत. निद्रावस्थेत असलेला उदासीन हिंदु समाज आणि त्याविरुद्ध त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्याकरता कोणत्याही थराला जाऊन संघटितपणे कार्य करणारे मुसलमान लक्षात घेता ते त्यांच्या उद्दिष्टाप्रत जाण्याची शक्यता अधिक दिसून येते.
(क्रमशः)
– श्री. गो.रा. ढवळीकर, ‘सुरश्री’, ढवळी, फोंडा, गोवा.(सप्टेंबर २०२४)
भाग २. वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/838256.html