साधनेची ओढ असलेली ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची बेंगळुरू, कर्नाटक येथील कु. रुद्राणी प्रशांत पाटील (वय ६ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. रुद्राणी प्रशांत पाटील ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०२० मध्ये ‘कु. रुद्राणी प्रशांत पाटील महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३.८.२०२४) |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
(‘वर्ष २०२० मध्ये कु. रुद्राणी हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती.’ – संकलक)
१. व्यवस्थितपणा
‘कु. रुद्राणी घरातील होमिओपॅथी औषधांची रचना पद्धतशीरपणे करून ठेवते. त्यामुळे हवी असलेली औषधे लगेच काढता येतात.
२. तिला सात्त्विक कपडे परिधान करायला आवडतात.
३. साधनेची ओढ
तिला साधनेविषयी सांगितल्यावर ती शांतपणे ऐकून घेते आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करते, उदा. तिला सकाळी उठल्यावर म्हणायचे मंत्र शिकल्यावर तिने ते लगेच पाठ केले. ती सकाळी उठल्यावर मंत्र म्हणते. ती नामजप करत शाळेत जाते. ती भावपूर्ण प्रार्थना करते आणि तिच्या भावाकडूनही प्रार्थना करून घेते.
४. चुकांविषयीची संवेदनशीलता
रुद्राणीला तिच्या चुकीची जाणीव करून दिल्यावर ती लगेच चूक स्वीकारते आणि क्षमा मागते. ती चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करते. ती दिवसभरात तिच्याकडून झालेल्या चुका देवाला सांगते आणि देवाची क्षमा मागते. ती आमच्याकडून होणार्या चुका आम्हाला सांगते.
५. ती जेव्हा सद़्गुरु नंदकुमार जाधव यांच्या समवेत असते, तेव्हा तिच्या चेहर्यावर तेज आणि तिच्या भोवती चैतन्याचे वलय दिसते. त्या वेळी ती पुष्कळ आनंदी दिसते.
६. भाव
अ. तिला ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ बघायला आवडतो आणि तो बघून तिची भावजगृती होते.
आ. ती आम्हाला सतत सांगते, ‘‘गुरुदेव आपल्याकडे बघत आहेत.’’
७. स्वभावदोष : हट्टीपणा आणि भावनाप्रधानता.
– सौ. जागृती प्रशांत पाटील (कु. रुद्राणी हिची आई), बेंगळुरू, कर्नाटक. (३.४.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.