Karnataka Urdu Mandatory : कर्नाटकातील मुदिगेरे येथील अंगणवाडी शिक्षिकांच्या नोकरीसाठी उर्दू अनिवार्य !
भाजपचा विरोध
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील अंगणवाडी शिक्षिकांसाठी उर्दू भाषा अनिवार्य करण्यात आल्याचा विरोध केला जात आहे. चिक्कमगळुरू जिल्ह्यातील मुदिगेरे येथील अंगणवाडी शिक्षिकेच्या पदासाठी उर्दू अनिवार्य करण्यात आली आहे. याविषयी महिला आणि बाल कल्याण विभागाकडून अधिकृत आदेश प्रसारित करण्यात आला आहे. भाजपने याला विरोध केला आहे. राज्यात उर्दू अधिकृत सरकारी भाषा नसतांना ती अनिवार्य करणे चुकीचे असल्याचे म्हटले जात आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवटच ! यामुळे काँग्रेसने असा आदेश देणे, यात काही नवल नाही ! काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ? |