Bangladesh Army Hijab : बांगलादेशातील महिला सैनिकांना आता हिजाब घालण्यास अनुमती !
बांगलादेशाच्या सैन्याचे इस्लामीकरण !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडल्यानंतर बांगलादेश झपाट्याने कट्टरतावादाकडे झुकत आहे. आता बांगलादेश सैन्यही इस्लामी कट्टरतावाद्यांच्या हाती गेले आहे. बांगलादेश सैन्याने प्रथमच महिला सैनिकांना हिजाब घालण्याची अनुमती दिली आहे. ‘जर महिला सैनिकांना हिजाब घालायचा असेल, तर त्या तो घालू शकतात’, असा आदेश ‘डज्युटंट जनरल’च्या कार्यालयातून देण्यात आला. यामध्ये महिला सैन्य कर्मचार्यांसाठी हिजाब घालणे ऐच्छिक करण्यात आले आहे. यापूर्वी बांगलादेशाच्या महिला सैनिकांना गणवेशासह हिजाब घालण्याची अनुमती नव्हती.
विविध गणवेशांसह (लढाऊ गणवेश, कार्यरत गणवेश, साडी) हिजाबचे नमुने सादर करावेत, असे निर्देश साहाय्यक कार्यालयाने दिले आहेत. फॅब्रिक, रंग आणि आकार देखील नमुन्यात समाविष्ट करण्यास सांगितले आहे. प्रस्तावित हिजाब परिधान केलेल्या महिला सैनिकांची रंगीत छायाचित्रे संबंधित विभागाकडे जमा करावी लागणार आहेत.
संपादकीय भूमिकाभविष्यात बांगलादेशात महिलांना सैन्यात प्रवेश देण्यावर बंदी आणली गेल्यास आश्चर्य वाटू नये ! |