Putin Warns To Use Nuclear Weapons : रशियावर क्षेपणास्त्रे किंवा ड्रोन यांद्वारे आक्रमणे झाल्यास अण्वस्त्रांचा वापर करू !
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची चेतावणी
मॉस्को (रशिया) – देशाच्या आण्विक नियमांमध्ये अनेक नवीन गोष्टी जोडल्या जातील. यात रशियाविरुद्ध क्षेपणास्त्र किंवा ड्रोन आक्रमण यांविरोधात अण्वस्त्रांचा वापर यांचाही समावेश आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला गंभीर धोका निर्माण करणार्या रशियाच्या प्रदेशावर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र किंवा ड्रोन यांद्वारे आक्रमण झाल्यास रशिया अण्वस्त्रेे वापरू शकतो, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे. पुतिन यांनी मॉस्कोमध्ये सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी हे विधान केले. यापूर्वीही पुतिन यांनी अशाच प्रकारचे विधान सार्वजनिक स्तरावर केले होते.
१. पुतिन म्हणाले की, अण्वस्त्र नसलेल्या देशाने जर अण्वस्त्रधारी देशाच्या पाठिंब्याने रशियावर आक्रमण केले, तर ते दोन्ही देशांनी केलेले आक्रमण मानले जाईल. रशियाकडे असणार्या अण्वस्त्रांमुळे देश आणि नागरिक यांची सुरक्षा अबाधित आहे.
२. ब्रिटनने युक्रेनला ‘स्टॉर्म शॅडो’ आणि अमेरिकेने ‘आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम’ क्षेपणास्त्रेे दिली आहेत. ही लांब पल्ल्याची प्राणघातक क्षेपणास्त्रेे आहेत, जी सुमारे ३०० कि.मी.पर्यंतच्या लक्ष्यांवर अचूक मारा करू शकतात. युक्रेन ही क्षेपणास्त्रे केवळ रशियाच्या सीमेवरच वापरू शकतो. ही अट पालटण्यासाठी युक्रेन प्रयत्न करत आहे. जेणेकरून रशियाच्या आत आक्रमण करता येईल.