सिल्लोड येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार्या ७ गोवंशियांची पोलिसांनी केली सुटका !
सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) – २१ सप्टेंबर या दिवशी शहरालगत असलेल्या स्मशानभूमीजवळ वाहनातून गोवंशियांची वाहतूक करणार्या २ धर्मांधांना शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. पोलिसांनी ७ जनावरे, पिकअप जीप असा एकूण ६ लाख ९० सहस्र रुपयांचा माल जप्त केला. शेख रमजानी शेख सिकंदर (वय ३५ वर्षे), शेख अशपाक शेख चांद (वय ३० वर्षे, दोघे रा. बोरगाव सारवण, ता. सिल्लोड) अशी संशयितांची नावे आहेत.
पिकअपमध्ये सिल्लोड शहरातील ईदगाहकडून छत्रपती संभाजीनगरकडे गोवंशियांची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी चालकास गाडी थांबण्यास सांगितले; परंतु चालकाने पोलिसांना पाहून गाडी न थांबवता वेगाने पळवली. पोलिसांनी पाठलाग करून गाडी अडवली. त्या वेळी गाडीमध्ये ७ जनावरे कोंबलेल्या अवस्थेत होती. पोलिसांनी जनावरे आणि गाडी जप्त करत दोघांना कह्यात घेतले. पोलिसांनी जनावरे पळशी गोशाळेत पाठवली आहेत. या प्रकरणी पोलीस कर्मचारी मंगलसिंह लोदवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील दोघांच्या विरोधात सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (गोवंशहत्या बंदी कायदा असूनही अशा घटना घडणे दुर्दैवी ! – संपादक)