संभाजी ब्रिगेडवर कायमस्वरूपी बंदी घाला ! – स्वामी भक्तांची मागणी
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे प्रांत कार्यालयावर मोर्चा
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – हिंदूंच्या देवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी जाणीवपूर्वक अवमानकारण वक्तव्य केले आहे. त्यामुळे ज्ञानेश महाराव यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि संभाजी ब्रिगेड या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी, या मागणीसाठी समस्त हिंदु समाज आणि स्वामीभक्त यांनी येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चेकर्यांनी प्रांताधिकारी मौसमी बर्डे-चौगुले यांना निवदेन दिले. या मोर्चात सकल हिंदु समाज बांधव, श्री स्वामी सेवाकेंद्र, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद या संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वामीभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.