ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्याकडून सन्मान !
भाग्यनगर – पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष आणि औसा येथील नाथ संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा तेलंगाणातील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी महाराजांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार मिळाल्याविषयी त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला. या प्रसंगी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ‘वारकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नरत आहोत आणि यापुढेही राहू’, असे सांगितले.