भोर (पुणे) येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध आंदोलन !
ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी !
भोर (जिल्हा पुणे), २५ सप्टेंबर (वार्ता.) – प्रभु श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य वक्तव्य करणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९९ आणि ३०२ या अंतर्गत गुन्हा नोंद करा, अशी मागणी सकल हिंदु समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली. २३ सप्टेंबरला शिवतीर्थ, भोर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने ज्ञानेश महाराव यांच्याविरुद्ध निषेध आंदोलन घेण्यात आले. या वेळी समस्त हिंदूंच्या वतीने एकमुखाने वरील मागणी करण्यात आली.
या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सुनील खळदकर, राहुल शिंदे, अक्षय पवार, भोर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि अन्नछत्रचे श्री. हेरंब रायरीकर, भाजप महिला मोर्चाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष सौ. पल्लवी फडणीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
आंदोलनाला सर्वश्री राहुल शिंदे, सोमनाथ ढवळे, विश्वजित चव्हाण, अक्षय पवार, सर्वेश शिवतरे, नितिन भागवत आदींसह अनेक स्वामीभक्त, शिवभक्त, श्रीरामभक्त आणि श्री स्वामी समर्थ परिवारातील भक्त, तसेच शिवप्रेमी आणि हिंदू उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्मावरील आक्रमणे रोखण्यासाठी हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदूंना रस्त्यावर उतरण्याची वेळ येणे दुर्दैवी ! |