हिंदु जनजागृती समितीच्या कार्यास माझे नेहमीच आशीर्वाद ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज
सोलापूर, २५ सप्टेंबर (वार्ता.) – अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेऊन कार्यासाठी आशीर्वाद घेतले. ही भेट ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे सल्लागार समिती सदस्य आणि प्रसिद्ध लेखापरीक्षक श्री. राजगोपाल मिणीयार यांच्या घरी झाली. या प्रसंगी स्वामीजींनी ‘समिती हिंदुत्वाचे चांगले कार्य करत असून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यास माझे नेहमीच आशीर्वाद आहेत’, असे सांगितले. या प्रसंगी समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूंत चरबीचे तेल मिसळणार्यांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी समिती आंदोलन करत असल्याचे सांगितले. या प्रसंगी महाराजांनी त्यांच्याकडे असलेला गुलाबाचा हार समितीच्या कार्यासाठी आशीर्वाद म्हणून श्री. विनोद रसाळ यांच्या गळ्यात घातला. या प्रसंगी श्री. दत्तात्रय पिसे उपस्थित होते.