सॅन डिएगो (अमेरिका) येथील कु. जान्हवी जेरे हिला रामनाथी (गोवा) येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात आलेली अनुभूती
‘वर्ष २०२२ मध्ये आमच्या शाळेला नाताळाची (ख्रिसमसची) सुटी होती. तेव्हा मी (कु. जान्हवी जेरे (वर्ष २०२४ मध्ये आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) आईसमवेत भारतात रामनाथी (गोवा) येथील ‘आध्यात्मिक संशोधन केंद्रा’मध्ये २ आठवड्यांसाठी रहायला आले होते. मला इतर वेळांपेक्षा या वेळी तेथे अधिक चैतन्य जाणवले. मी दुपारी विचार करत होते, ‘मला अमेरिकेपेक्षा इकडे अधिक चैतन्य वाटत आहे.’ मी डोळे बंद केले आणि मला माझ्या डोळ्यांसमोर एक त्रासदायक शक्तीने भरलेला गोल दिसला. त्या गोलात मला माझे मित्र-मैत्रिणी, वर्ग आणि शाळा दिसली. मी मागे वळून पाहिले, तर मला दुसरा गोल दिसला; पण या वेळी गोल चैतन्याने भरलेला होता. मला त्या गोलात प. पू. डॉ. आठवले दिसले, तसेच साधक दिसले आणि आनंद अनुभवता आला. मला या अनुभूतीसाठी पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– कु. जान्हवी जेरे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), सॅन डिएगो, कॅलिफोर्निया, अमेरिका. (३.२.२०२२)
|