भावजागृती झाल्यावर साधिकेच्या डाव्या डोळ्यात प्रथम पाणी येत असणे आणि त्या डोळ्यात ‘ॐ’ उमटणे
‘१.११.२०२० या दिवशी रात्री आवरतांना मी सहज आरशात पाहिले, तेव्हा मला माझा डावा डोळा लाल झाल्यासारखा दिसला; म्हणून मी आरशाच्या अजून जवळ जाऊन पाहिले. तेव्हा मला माझ्या डोळ्यात ‘ॐ’ उमटलेला दिसला. या ‘ॐ’ विषयी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. आरशात पाहिल्यावर ‘ॐ’ सुलट दिसतो आणि प्रत्यक्ष पहाणार्याला तो उलट दिसतो.
२. मागील काही दिवसांपासून ‘माझी भावजागृती होते, तेव्हा पुष्कळ वेळा माझ्या डाव्या डोळ्यातून प्रथम पाणी येते’, असे मी अनुभवते.
३. भावजागृती झाल्यावर माझ्या डाव्या डोळ्याच्या ज्या कोपर्यातून पाणी येते, त्या कोपर्यात ‘ॐ’ उमटला आहे.
हे मला वेगळे वाटले आणि अनुभवता आले.’
– कु. स्मितल भुजले, फोंडा, गोवा. (७.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |