परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. संकेत कुलकर्णी यांच्याप्रती भाव असलेले कपिलेश्वरी, फोंडा येथील श्री. मदनप्रसाद जैसवाल !

पू. संकेत गुरुदास कुलकर्णी

१. पू. संकेत कुलकर्णी यांचे वडील श्री. गुरुदास कुलकर्णी यांची ‘अँजिओप्लास्टी’ झाली असल्याने त्यांना पू. संकेतदादांच्या सेवेसाठी साहाय्याची आवश्यकता भासणे 

‘पू. संकेत कुलकर्णी (सनातनचे ९६ वे संत, वय ३४ वर्षे) विकलांग असल्याने त्यांची आई (सौ. सुजाता) आणि वडील (श्री. गुरुदास) पू. संकेतदादांची सर्व सेवा करतात. जानेवारी २०२४ मध्ये श्री. गुरुदास यांची ‘अँजिओप्लास्टी’ (टीप) झाली. त्यांना एक मास विश्रांतीची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांना पू. संकेतदादांच्या सेवेसाठी साहाय्याची आवश्यकता होती. (टीप – अँजिओप्लास्टी’ : हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी केले जाणारे एक प्रकारचे शस्त्रकर्म)

श्री. मदनप्रसाद जैसवाल

२. पू. संकेतदादांना स्नानगृहात नेऊन अंघोळ घालण्याची सेवा करण्यासाठी श्री. मदनप्रसाद जैसवाल यांनी तत्परतेने होकार दर्शवणे

पू. संकेतदादांना स्नानगृहात उचलून नेऊन सांभाळून अंघोळ घालावी लागते. यासाठी साधकांनी सनातनच्या मार्गदर्शनानुसार नामसाधना करणारे कपिलेश्वरी, फोंडा येथील भाजीविक्रेते श्री. मदनप्रसाद जैसवाल यांना विचारले. श्री. जैसवालदादांनी तत्परतेने होकार दिला. त्यांनी अनुमाने १ मास संतसेवा केली.

श्री. दीपक रामचंद्र छत्रे

३. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. संकेत कुलकर्णी यांच्याप्रती श्री. मदनप्रसाद जैसवाल यांचा भाव

अ. त्यांनी सांगितले, ‘‘मी पू. संकेतदादांमधील सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना (प.पू. डॉ. आठवले यांना) वंदन करून ही सेवा केली.

आ. पू. संकेतदादांना देहभान रहात नसल्याने त्यांना अंघोळीसाठी घेऊन जातांना काही वेळा ते माझ्यावरच मूत्रविसर्जन करत. तेव्हा मी यातून ‘माझे प्रारब्ध अल्प होईल’, असा भाव ठेवला.’’

इ. या सेवेच्या संदर्भात बोलतांनाही जैसवालदादांची भावजागृती होत होती.

ई. जैसवालदादांना सेवेनिमित्त पैसे देऊ केल्यावर त्यांनी ते नम्रपणे नाकारले.

उ. त्यांनी सांगितले, ‘‘संतसेवा लाभणे हे भाग्य आहे आणि पुन्हा आवश्यकता भासल्यास मला सांगू शकता.’’

श्री. जैसवाल यांनी नि:स्वार्थीपणे आणि भावपूर्ण संतसेवा करून सर्व साधकांच्या समोर आदर्श ठेवला आहे.’

– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, बांदोडा, गोवा. (१.४.२०२४)