बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकला ! – सुरेश चव्हाणके

‘घुसखोरमुक्त महाराष्ट्र संकल्प’ कार्यक्रम

व्यासपिठावर उपस्थित श्री. सुरेशजी चव्हाणके (दीपप्रज्वलन करताना) आणि त्यांच्या समवेत अन्य संत अन् मान्यवर

नाशिक – बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान अनधिकृतपणे भारतात रहात आहेत. त्यांच्यासाठी विशेष योजना राबवण्यापेक्षा आपणच त्यांना भारताबाहेर काढणे, ही काळाची आवश्यकता झाली आहे, असे प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीचे संपादक डॉ. सुरेशजी चव्हाणके यांनी केले. ते ‘महाराष्ट्र सिव्हिल सोसायटी’च्या वतीने आयोजित महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक येथे आयोजित ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्र संकल्प’ या कार्यक्रमात बोलत होते.

डॉ. चव्हाणके यांनी भारतामधील, विशेषतः महाराष्ट्रामधील बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान यांना देशाच्या बाहेर काढण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली. त्यामध्ये देशाची सद्यपरिस्थिती विशद केली. बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना शोधून त्यांच्यावर आपण कशा प्रकारे कारवाई करू शकतो ? याविषयी समजावून सांगितले.

स्वामी भामानंदजी, जनेश्वराजी महाराज, परमेश्वरानंदजी महाराज, ज्ञानेश्वरानंदजी महाराज, दत्ताजी महाराज, धर्माभिमानी रामसिंग बावरी अण्णाजी पाटील, सुनील बच्छाव इत्यादी संत आणि मान्यवर यांची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचा लाभ ५०० हिंदुत्वनिष्ठांनी घेतला.

संपादकीय भूमिका :

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पोलीस आणि प्रशासन केव्हा पावले उचलणार ?