Bhopal Hamidia Hospital Land Jihad : भोपाळ (मध्यप्रदेश) येथील सरकारी रुग्णालयाच्या परिसरात बांधली जात आहेत थडगी !
|
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील हमीदिया सरकारी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या मशिदीला मोठे स्वरूप दिले जात असून येथील थडग्यांची संख्या वाढवली जात आहे. लोकांकडून याला विरोध करण्यात येत आहे, असे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.
या वृत्तात म्हटले आहे की, हमीदिया रुग्णालयाच्या आजूबाजूचा परिसर मुसलमानबहुल आहे. त्यामुळे तेथे कुणीही उघडपणे विरोध करू शकत नाही. याचाच लाभ उठवत रुग्णालयाच्या आवारातील थडग्यांची संख्या झपाट्याने वाढवली जात आहे. तेथे लोखंडी प्रवेशद्वारही बसवले जात आहे. येथे शुक्रवारच्या नमाजपठणासाठी ५ सहस्रांहून अधिक लोक एकत्र येतात. त्यामुळे रुग्णालयाचे व्यवस्थापन सांभाळणे मोठे आव्हान बनले आहे.
‘ज्युनिअर डॉक्टर्स असोसिएशन’ने याप्रकरणी तक्रार केली; मात्र कारवाई होत नसल्याने तेही संतप्त झाले असून डॉक्टरांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. लँड जिहादच्या या कटाविषयी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनीही तक्रार केल्याचे समोर आले आहे.
संपादकीय भूमिकामध्यप्रदेशात गेली अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांना सरकारी रुग्णालयाच्या परिसरात अशी घटना कशी घडते ?, असा प्रश्न उपस्थित होतो ! |