Muhammad Yunus : बांगलादेशातून रोहिंग्‍यांना परत मायदेशी पाठवणे हाच या संकटावर कायमचा उपाय ! – प्रा. महंमद युनूस

बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे प्रमुख प्रा. महंमद युनूस यांचे संयुक्‍त राष्‍ट्रांत विधान

न्‍यूयॉर्क (अमेरिका) – बांगलादेशाने रोहिंग्‍यांना आश्रय देण्‍याविषयी सहानुभूती दर्शवली आहे; परंतु परिस्‍थितीशी संबंधित सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय खर्च वाढत आहे. त्‍यामुळे बांगलादेश मानवतावादी पैलूंमध्‍ये कितीही गुंतले किंवा न्‍याय सुनिश्‍चित करत असले, तरी रोहिंग्‍यांना परत मायदेशी (म्‍यानमार येथे) पाठवणे हाच सध्‍याच्‍या संकटावर कायमस्‍वरूपी उपाय आहे, असे विधान बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे प्रमुख प्रा. महंमद युनूस यांनी येथे केले. प्रा. युनूस सध्‍या अमेरिकेच्‍या दौर्‍यावर आहेत. येथे त्‍यांनी ७९ व्‍या संयुक्‍त राष्‍ट्र महासभेच्‍या वेळी झालेल्‍या उच्‍चस्‍तरीय बैठकीत रोहिंग्‍यांना मायदेशी परत पाठवण्‍यावर सूत्र मांडले.

संपादकीय भूमिका

१० लाख धर्मबंधू रोहिंग्‍यांना पोसणे बांगलादेशाला कठीण जात आहे, तर भारतात घुसखोरी करून आलेल्‍या कोट्यवधी बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना भारताने तरी का पोसले पाहिजे ? त्‍यांनाही त्‍यांच्‍या मायदेशी पाठवण्‍यासाठी भारताने जागतिक स्‍तरावर मत मांडले पाहिजे !