Maulana TauqeerRaza Provokes Muslims : जमावाने आक्रमण केले, तर एकाला पकडून मरेपर्यंत मारा ! – मौलाना तौकीर रझा
मौलाना तौकीर रझा यांची मुसलमानांना चिथावणी !
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)
नवी देहली – जर जमावाने तुमच्यावर आक्रमण केले, तर त्यातील एकाला पकडा आणि त्याला मरेपर्यंत मारहाण करा, असे चिथावणीखोर विधान विधान बरेली (उत्तरप्रदेश) येथील ‘इत्तेहादे मिल्लत कौन्सिल’चे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा यांनी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. हा व्हिडिओ संभाजीनगर येथील एका कार्यक्रमाचा असल्याचे म्हटले जात आहे.
If a mob attacks, get hold of one, and beat him to death. – Maulana Tauqeer Raza provokes the Mu$l!ms yet again.
👉 Maulana Tauqeer Raza provocation and controversial statements, are never inquired by the law. It is shameful for all Governments that his instigations always go… pic.twitter.com/2qhWu6lnEA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 25, 2024
मौलाना तौकीर रझा म्हणाले की, आपण स्वतःचे रक्षण केले पाहिजे. स्वतःच्या रक्षणासमवेतच आपल्या बहिणी-मुलींनाही सुरक्षित ठेवावे लागेल; कारण आपल्या बहिणी-मुली सुरक्षित नाहीत, तसेच मशीदही सुरक्षित नाही. (याला म्हणतात चोरांच्या उलट्या बोंबा ! भारतात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मुसलमानबहुल भागांतून जातांना सुरक्षित नाहीत, तसेच लव्ह जिहादपासून हिंदूंच्या मुली सुरक्षित नाहीत, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक) सरकारच्या दबावाखाली न्यायालय निर्णय देत आहे. मुसलमानांच्या विरोधात जे काही घडत आहे, तो देशद्रोहाचा भाग आहे आणि हे सर्व नियोजित आहे. त्यांना या गोष्टींमध्ये मुसलमानांना अडकवायचे आहे. आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.
संपादकीय भूमिकामौलाना तौकीर रझा नेहमीच चिथावणीखोर आणि वादग्रस्त विधाने करत असतात; मात्र त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई होत नाही, हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद ! दुसरीकडे हिंदु नेत्याने काही विधान केले, तर लगेच त्याच्याविरुद्ध कारवाई होते ! |