Taj Mahal Tejomahalay Case : ताजमहालच्या संदर्भात मुसलमान पक्षाकडून न्यायालयात कथित पुरावे सादर !
तेजोमहालयात सणांच्या वेळी पूजा करण्याची हिंदूंनी मागितली आहे अनुमती !
आगरा (उत्तरप्रदेश) – ताजमहाल हे तेजोमहालय आहे. येथे हिंदूंच्या सणांच्या वेळी पूजा आणि जलाभिषेक करण्याची अनुमती देण्यासाठी हे प्रकरण न्यायालयात पोचले आहे. या प्रकरणात मुसलमान पक्षाच्या वतीने न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला आहे, तसेच ताजमहाल येथे कबर असल्याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यावर वादी पक्षाने आक्षेप नोंदवण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी ७ ऑक्टोबरला होणार आहे.
योगी युवा ब्रिगेडचे अजय तोमर आणि अधिवक्ता शिव आधार सिंह तोमर यांनी न्यायालयात खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे. यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी सय्यद इब्राहिम हुसेन यांनी त्यांच्या अधिवक्त्यांच्या माध्यमातून मुसलमान पक्षाच्या वतीने अर्ज सादर केला आहे.