दिवसभरातील घडामोडींवर दृष्टीक्षेप : अल्पवयीन मुलीवर धर्मांधाकडून बलात्कार, महिलेच्या पोटातून कोकेनच्या १२४ कॅप्सूल जप्त !
अल्पवयीन मुलीवर धर्मांधाकडून बलात्कार
नालासोपारा – ओळख झाल्यावर मुंबईतील १६ वर्षीय मुलीला येथील अनिस शेख (वय २३ वर्षे) याने उद्यानात भेटण्यासाठी बोलावले. तेथे अनिसने मित्रासह तिच्याशी लगट केेले. लॉजमध्ये नेऊन अनिसने मुलीवर बलात्कार केला. (मुलींनी धर्मांधांशी मैत्री करण्यापूर्वी १०० वेळा विचार करायला हवा. धर्मांपासून दूर रहाण्यातच हिंदु मुलींचे हित आहे ! – संपादक) मित्राने त्याचे भ्रमणभाषमध्ये चित्रण केले. हा प्रकार कुणाला न सांगण्याची धमकी देत मुलीला मारहाण केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनिसला अटक केली. त्याचा मित्र फरार आहे.
संपादकीय भूमिका : अशा वासनांधांना तात्काळ फाशीच द्यायला हवी !
महिलेच्या पोटातून कोकेनच्या १२४ कॅप्सूल जप्त !
मुंबई – ब्राझीलहून मुंबई विमानतळावर उतरेल्या जॅकलिन माल्टेज टायगर (वय ३६ वर्षे) हिच्या हालचाली ‘डीआर्आय’च्या (महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या) अधिकार्यांना संशयास्पद वाटल्या. तिने पोटात अमली पदार्थ लपवल्याचा संशय आल्याने तिला वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. आधुनिक वैद्यांनी तिच्या पोटातून ९ कोटी ७५ लाख रुपये किमतीच्या कोकेनच्या १२४ कॅप्सूल काढल्या. तिला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीचा शोध चालू आहे.
चाळीसगावमध्ये दुसरा बिबट्या जेरबंद !
चाळीसगाव – मागील आठवड्यात गणेशपूर शिवारात १२ वर्षांचा मुलाचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाने तात्काळ गणेशपूर शिंदी शिवारात ठिकठिकाणी पिंजरे लावले होते. त्यात दुसर्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. १९ सप्टेंबर या दिवशी एका बिबट्याला पकडले होते.
पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने धर्मांधांचा मित्रावर वार !
पुणे – कोंढव्यातील कडनगर परिसरात अरबाजने योगेशकडे पेट्रोलसाठी पैसे मागितल्यावर योगेशने नकार दिल्यावर तो चिडला. शिवीगाळ करून त्याने योगेशला मारहाण केली, तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या प्रकरणी योगेश लोंढे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात प्रविष्ट केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अरबाज सय्यद याला अटक केली आहे.
संपादकीय भूमिका : लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत बहुसंख्य !