पू. दातेआजींच्या खोलीत गेल्यावर आपोआप नामजप चालू होणे आणि ‘त्यांच्या चेहर्याकडे एकसारखे पहात रहावे’, असे वाटणे
‘३०.७.२०२४ या दिवशी रुग्णाईत असलेल्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत, वय ९१ वर्षे) यांना मी रामनाथी आश्रमात भेटण्यासाठी गेले होते. ‘पू. आजींच्या खोलीत गेल्यावर माझा ‘निर्विचार’ नामजप आपोआप चालू झाला. पू. आजींचा चेहरा एखाद्या लहान मुलासारखा आणि तेजस्वी दिसत होता. त्यांच्या चेहर्यावर एकही सुरकुती नव्हती. ‘त्यांच्या चेहर्याकडे एकसारखे पहात रहावे’, असे मला वाटत होते.’
– सौ. संगीता लोटलीकर, खडपाबांध, फोंडा, गोवा. (वय ६४ वर्षे, वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्के) (३०.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |