धर्माचरणाची आवड असणारी महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची बेंगळुरू येथील चि. अवनी चिम्मलगी (वय ३ वर्षे ७ मास) !

(वर्ष २०२४ मध्ये चि. अवनी चिम्मलगी हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे. – संकलक)

चि. अवनी चिम्मलगी

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. इतरांची काळजी घेणे

अ. ‘एकदा आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो. मी चि. अवनीला उचलून धरल्यामुळे काही वेळाने माझे हात दुखू लागले. तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘खाली उतरतेस का ? माझे हात दुखत आहेत.’’ त्या वेळी ती पटकन खाली उतरली आणि तिच्या वडिलांना म्हणाली, ‘‘आईचे हात दुखत आहेत. त्यामुळे तुम्ही मला उचलून घ्या.’’

आ. अवनीच्या आजीला शारीरिक त्रास असल्याने औषधे घ्यावी लागतात. त्यांना सकाळी आणि संध्याकाळी औषधे घेतांना अवनीने पाहिले. तिसर्‍या दिवसापासून ती औषधाची बाटली आणि पाणी घेऊन आजीकडे जायची अन् त्यांना औषधे घ्यायला सांगायची.

सौ. रश्मी चिम्मलगी

२. अवनी शाळेतील किंवा इतर मुलांमधे लगेच मिसळते.

३. इतरांना साहाय्य करणे

अ. अवनीला घरकामात साहाय्य करणे पुष्कळ आवडते.

आ. अवनीला स्वयंपाकाची आवड आहे. मी चपात्या करतांना माझ्यासमवेत तिलाही चपात्या करायच्या असतात. माझ्या सर्व चपात्या करून पूर्ण होईपर्यंत ती माझ्यासमवेत थांबते.

इ. ‘घर आवरण्यासाठी मला साहाय्य करशील का ?’, असे मी अवनीला म्हटल्यावर ती लगेचच उठून तिची खेळणी गोळा करून व्यवस्थित ठेवते.

ई. घरात कुठे कचरा दिसल्यास ती लगेच तो उचलून कचरापेटीत टाकते.

४. अवनीला स्वतःकडून होणार्‍या चुकांची जाणीव होते.

५. धर्माचरणाची आवड असणे

अ. तिला कपाळावर कुंकू लावायला आणि हातात बांगड्या घालायला आवडतात. तिला परकर-पोलके आणि साडी यांसारखे पारंपरिक वेश आवडतात.

आ. अवनी सकाळी उठल्यावर ‘कराग्रे वसते लक्ष्मीः’ हा श्लोक आणि संध्याकाळी ‘शुभंकरोति’ नियमितपणे म्हणते. ती मारुति स्तोत्र म्हणायला शिकत आहे.

६. अवनी प्रतिदिन कुलदेवी आणि दत्तगुरु यांचा नामजप, तसेच अत्तर-कापूर यांचे उपाय नियमितपणे करते.

७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रति असलेला भाव

अ. तिच्यामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रति भाव आहे. ‘तुझे हे अयोग्य वागणे प.पू. डॉक्टरांना आवडणार नाही’, असे आम्ही तिला सांगितल्यावर ती ते बोलणे गांभीर्याने घेते आणि योग्य प्रकारे वागण्याचा प्रयत्न करते.

आ. ‘आज प.पू. डॉक्टर आपल्या घरी येणार आहेत’, असे आम्ही अवनीला सांगितल्यावर तिचा चेहरा आनंदाने खुलतो.

८. अवनीवर चांगले संस्कार करण्यासाठी पालक करत असलेले प्रयत्न

अ. आम्ही अवनीला इतर स्तोत्रे शिकवणे आणि तिच्या नामजपाचा कालावधी वाढवणे यांसाठी प्रयत्न करत आहोत.

आ. तिच्याकडून होणार्‍या चुका तिच्या लक्षात आणून देऊन त्या सुधारण्यासाठी आम्ही तिला साहाय्य करत आहोत.

इ. प.पू. डॉक्टरांची शिकवण आणि इतर संत यांच्याविषयी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.

९. अवनीमधील स्वभावदोष

अ. हट्टीपणा : अवनीला चॉकलेट आणि बिस्कीट खाल्ल्याने होणार्‍या दुष्परिणामांविषयी सांगूनही ती ते पदार्थ खाण्याचा हट्ट करते.

आ. आक्रमकता : आम्ही ‘भ्रमणभाष अधिक वेळ पाहू नकोस’, असे सांगितल्यावर अवनी आक्रमक होऊन रडते.’

– सौ. रश्मी चिम्मलगी (अवनीची आई), बेंगळुरू, कर्नाटक. (२७.६.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.