Boycott Thook N Urine Jihadist In UP : अन्नपदार्थांमध्ये थुंकी किंवा लघवी मिसळणार्‍यांवर यापुढे बहिष्कार !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील हिंदु महापंचायतीची घोषणा !

मूत्र आणि थुक जिहाद विरोधात भरविण्यात आलेली पंचायत

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) : अन्नपदार्थांमध्ये थुंकी मिसळणार्‍या लोकांवर यापुढे आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार घालण्याची घोषणा येथे भरवण्यात आलेल्या हिंदु महापंचायतीने केली. महापंचायतीच्या वतीने याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह स्थानिक आमदार आणि पोलीस अक्षीक्षक यांना देण्यात आले आहे. टिला गावात २२ सप्टेंबर या दिवशी हिंदु संघटनांनी सर्व हिंदु समाजाला एकत्रित करून ही महापंचायत बोलावली होती. यामध्ये साधू-संतांंसह पंचक्रोशीतील सहस्रो हिंदू सहभागी झाले होते.

जाती-पाती बाजूला ठेवून हिंदु समाजाला संघटित व्हावे लागेल ! – स्वामी दीपंकर महाराज

स्वामी दीपंकर महाराज

महापंचायतीला संबोधित करतांना स्वामी दीपंकर महाराज म्हणाले की, जाती-पाती बाजूला ठेवून हिंदु समाजाला संघटित व्हावे लागेल. संपूर्ण समाजाने एकत्र येण्याची वेळ आली आहे.’

साध्वी डॉ. प्राची

साध्वी डॉ. प्राची म्हणाल्या की, हिंदु समाजातील सर्व समुदायांना एकत्र यावे लागेल. इतर समाजातील लोक हिंदु मुली आणि महिला यांना फसवण्यासाठी हिंदु नावे धारण करत आहेत. जर त्यांना हिंदु नावे इतकी आवडत असतील, तर त्यांनी त्यांचा धर्म पालटून हिंदु धर्मात यावे, आम्ही त्यांना स्वीकारू.’

आमदार नंदकिशोर गुर्जर

लोणीतील भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनीही पंचायतीमध्ये उपस्थित लोकांना संबोधित केले. या वेळी सर्वांनी खाद्यपदार्थांमध्ये थुंकी किंवा लघवी मिसळणार्‍या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीही केली.

१० दिवसांपूर्वीच घडली होती घटना !

येथे १५ सप्टेंबर या दिवशी फळांचा रस विकणारा आमीर खान ग्राहकांना रसामध्ये त्याची लघवी मिसळून प्यायला देत असल्याचे समोर आले होते. त्याच्या या किसळवाण्या कृत्याची माहिती समजताच संतप्त लोकांनी आरोपी आमीर खान आणि त्याचा एक सहकारी यांना चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. लोकांनी आमीर खान याच्या दुकानात प्रवेश करताच लोकांना तेथे प्लास्टिकच्या कॅनमध्ये एक लिटर लघवी आढळून आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आमीर खान आणि त्याचा सहकारी यांना अटक केली आहे.

हे वाचा – Ghaziabad Urine Jihad : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे फळांच्‍या रसामध्‍ये लघवी मिसळून विकत होता धर्मांध दुकानदार !

संपादकीय भूमिका

पोलिसांनी ‘थुंक जिहाद’ करणार्‍यांविरुद्ध वेळीच कारवाई केली असती, तर जनतेवर असा निर्णय घेण्याची वेळ आली नसती !