Muhammad Younus Face Protest In America : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे बांगलादेशाचे प्रमुख महंमद युनूस यांच्या विरोधात बांगलादेशी नागरिकांचे आंदोलन

बांगलादेशाचे प्रमुख महंमद युनूस यांच्या विरोधात बांगलादेशी नागरिकांचे आंदोलन

न्यूयॉर्क (अमेरिका) – बांगलादेशात हिंदूंच्या विरोधातील हिंसाचार पूर्ण थांबलेला नाही. तेथे अद्यापही हिंदु, बौद्ध यांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जात आहे. अशा परिस्थितीत अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस अमेरिका दौर्‍यावर आले आहेत. युनूस न्यूयॉर्क येथे पोचले असता ते रहात असलेल्या हॉटेलबाहेर बांगलादेशी नागरिक जमले आणि त्यांनी अल्पसंख्यांकांवर होणार्‍या आक्रमणांवरून युसून यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

गलिच्छ राजकारण करून सत्ता मिळवली ! – आंदोलक

येथे आंदोलन करणारे शेख जमाल हुसेन म्हणाले की, डॉ. महंमद युनूस यांनी घटनाबाह्य आणि चुकीच्या पद्धतीने सत्ता हातात घेतली आहे. त्यांनी गलिच्छ राजकारण करून सत्ता मिळवली. बांगलादेशात गेल्या काही मासांत बरेच लोक मारले गेले. आतापर्यंत निवडून आलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यागपत्र दिलेले नाही. आम्ही संयुक्त राष्ट्रांना नम्रपणे विनंती करतो की, त्यांनी बांगलादेशी लोकांचे येथे प्रतिनिधित्व करू नये.’

दुसरे आंदोलक डी.एम्. रोनाल्ड म्हणाले की, आमचा धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर विश्‍वास आहे. सत्तेवर आल्यानंतर युनूस यांनी हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती यांना मारणे चालू केले. बांगलादेशात आमचे लोक सुरक्षित नाहीत.

संपादकीय भूमिका

अमेरिकेतील भारतीय वंशाचे हिंदू असा विरोध का करत नाहीत ?