Israel Air Strike Against Hezbollah : लेबनॉनवरील इस्रायलच्या आक्रमणात ५८५ जण ठार  

  • १ सहस्र ८०० हून अधिक जण घायाळ

  • इस्रायलची भूमीवरून लेबनॉनमध्ये घुसूनही कारवाई करण्याची शक्यता !

बेरूत (लेबनॉन) – पेजर, वॉकी-टाकी आदींच्या स्फोटानंतर इस्रायलच्या  वायूदलाने लेबनॉनमधील हिजबुल्ला या जिहादी आतंकवादी संघटनांच्या ठिकाणांवर गेल्या काही दिवसांपासून हवाई आक्रमणे चालू केली आहेत. २३ सप्टेंबरलाही रात्री इस्रायलकडून हवाई आक्रमण करण्यात आले. या आक्रमणांत आतापर्यंत ५८५ लोकांचा मृत्यू झाला, तर १ सहस्र ८०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. मृतांमध्ये ३५ मुले आणि ५८ महिला यांचा समावेश आहे. यानंतर इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये घुसून आक्रमण करू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी लेबनॉनला लागून असलेल्या इस्रायलच्या सीमवर्ती भागातील लोकांना घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे इस्रायली सैन्य भूमीवरून आक्रमण करण्याच्या सिद्धतेत असल्याची चर्चा चालू आहे.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवाद कसा संपवायचा ? हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर इस्रायल दाखवत आहे. भारत हे कधी शिकणार आणि कधी कृती करणार ?