लाचखोर ग्रामविस्तार अधिकार्यासह कंत्राटी सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले !
पारोळा (जिल्हा जळगाव) – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील संमत झालेल्या काँक्रिटीकरण आणि पेव्हर ब्लॉक या कामांचा आदेश काढण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांची लाच घेणार्या पारोळा पंचायत समिती कार्यालयातील ग्रामविस्तार अधिकार्यासह कंत्राटी सेवकाला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील (वय ५८ वर्षे) आणि कंत्राटी सेवक कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय २८) अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघांनी १ लाख ८० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. (भ्रष्टाचाराची ही कीड समूळ नष्ट करण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना अनिवार्य ! – संपादक) या प्रकरणी सरपंचांच्या मुलाने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.