पुणे येथील २ गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांकडून गुन्हे नोंद !
विनाअनमुती उच्च क्षमतेच्या ध्वनीक्षेपकाचा वापर
पुणे – श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये उच्च क्षमतेच्या ध्वनीक्षेपकांचा वापर केल्याप्रकरणी २ मंडळांवर सहकार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील ‘अखिल गुरुदत्त तरुण मित्र मंडळ’ आणि ‘शिवतीर्थ मंडळ’ या २ मंडळांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या दोन्ही श्री गणेशोत्सव मंडळांनी १७ सप्टेंबर या दिवशी मिरवणूक काढली. यामध्ये विनाअनुमती उच्च क्षमतेच्या ध्वनीक्षेपकाचा वापर केला. ध्वनीमर्यादेची पातळी ओलांडल्याने रहिवाशांना त्रास झाला, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही मंडळांचे अध्यक्ष, ध्वनीवर्धक पुरवठादार यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.