पिंपरी-चिंचवड शहरातील पूररेषेच्या आतील अनधिकृत बांधकामांना नोटीसा !
आतापर्यंत २ सहस्र ५०० बांधकामांना नोटीस जारी, अजूनही सर्वेक्षण चालू !
पिंपरी (पुणे) – शहरांमधून वहाणार्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांना आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर निळ्या पूररेषेतील बांधकामांचे महापालिकेने सर्वेक्षण (मोजणी आणि पहाणी) चालू केले आहे. सर्वेक्षणामध्ये २ सहस्र ५०० बांधकामे आढळली आहेत. त्यामध्ये निवासी आणि व्यावसायिक बांधकामांचा समावेश आहे. अनधिकृत बांधकामधारकांना महापालिकेने नोटीस पाठवली आहे. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी २४.३४ कि.मी., इंद्रायणी नदीची लांबी २०.८५ कि.मी., तर मुळा नदी शहराच्या सीमेवरून १० कि.मी. लांबीने वहाते. या नद्यांच्या पुराची सरासरी निश्चिती करून ‘निळी पूररेषा’ ठरवली आहे. या पूररेषेत बांधकाम करता येत नाही. तरीही तेथे अनधिकृत बांधकामे करण्यात येत आहेत.
पुराचे पाणी बांधलेल्या घरांमध्ये शिरते आणि मालमत्तेची हानी होते. या बांधकामांना नोटिसा दिल्या आहेत, तसेच ओढा आणि नाल्यांवरील अतिक्रमण अन् बांधकामे काढण्यात येणार आहेत. ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने दिलेल्या आदेशानुसार इंद्रायणीच्या पूररेषेतील चिखली परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यात येणार आहेत.
संपादकीय भूमिकाअनधिकृत बांधकामे होईपर्यंत प्रशासनातील अधिकारी झोपा काढत होते का ? या बांधकामांना उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे. |