गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकार्याला रुग्ण अरिफ सिद्दिकी याच्याकडून मारहाण
पणजी, २३ सप्टेंबर (वार्ता.) – बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आधुनिक वैद्य महेश पंचे यांना छातीवर मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयातील रुग्ण तथा केरळस्थित युवक अरिफ सिद्दिकी याला कह्यात घेतले आहे. अरिफ सिद्दिकी हा २० सप्टेंबर या दिवशी पेडणे येथे एका अपघातात घायाळ झाला होता आणि त्यानंतर त्याला प्रथम म्हापसा येथील आझिलो रुग्णालयात अन् नंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. त्याने आधुनिक वैद्य महेश पंचे यांना ‘सलाईन स्टँड’ने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. आधुनिक वैद्यांना मारहाण करण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी त्याला पणजी येथील प्रथमश्रेणी न्यायालयात उपस्थित केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाउपचार करणार्या आधुनिक वैद्यांविषयी कृतज्ञता सोडाच त्यांच्यावरच आक्रमण करणारे धर्मांध ! |