एस्.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदी भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती !

मुंबई – शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २ दिवसांपूर्वी भरत गोगावले यांना एस्.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदाची विचारणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली होती; मात्र पदभार स्वीकारला नसल्याचे त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले होते. २३ सप्टेंबर या दिवशी एस्.टी. महामंडळाच्या मुख्यालयात भरतशेठ गोगावले यांनी पदभार स्वीकारला.

भरतशेठ गोगावले यांना एस्.टी.महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर त्यांचे समर्थक आणि आमदार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न राहील ! – भरतशेठ गोगावले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य एस्.टी. महामंडळ

एस्.टी. महामंडळाला लवकरच नवीन २ सहस्र २०० नवीन गाड्या प्राप्त होणार आहेत. एस्.टी. कामगारांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत, याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.